आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:एसटी बसच्या फेऱ्या सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन

नगर तालुका3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नगर तालुक्याच्या दक्षिण भागातील एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले असून ३-३ दिवस बसच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला. विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. या भागातील बसेसच्या फेऱ्या सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ यांनी दिला.

नगर तालुक्याच्या दक्षिण भागातील वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, मठापिंप्री, हातवळण, आंबीलवाडी, वडगाव, तांदळी, गुणवडी, राळेगण आदी गावांमधील विद्यार्थी येतात रुई छत्तीशी येथे शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यासाठी त्यांना एसटी बस शिवाय दुसरा पर्याय नाही. या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सुमारे ५०० च्या पुढे आहे. एसटी बस न आल्यास या विद्यार्थ्यांना एक तर शाळा बुडवावी लागते किंवा जे खाजगी वाहन भेटेल त्या वाहनाने जावे लागते. यात मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला, असे हराळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...