आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात दिवस किर्तन:रस्तापूरला सोमवारपासून‎ हरिनाम सप्ताहाचे आयोजन‎

कौठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्तापूर येथील हनुमान मंदिर‎ येथे साेमवारपासून, ६ फेब्रुवारी ग्रंथराज‎ ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे‎ आयोजन रस्तापूर ग्रामस्थांनी केले‎ आहे. या सप्ताहात नामवंत‎ कीर्तनकारांची सात दिवस किर्तन सेवा‎ होणार आहे. सप्ताहादरम्यान श्री क्षेत्र‎ देवगड पिठाचे महंत गुरुवर्य‎ भास्करगिरी महाराज हे सदिच्छा भेट‎ देणार आहेत.

नेवासे तालुक्यातील‎ रस्तापूर येथील हनुमान मंदिरासमोर ६‎ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत‎ हाेणाऱ्या सप्ताहात संजय महाराज‎ सरोदे, नितीन महाराज हारकळ,श्रीरंग‎ महाराज स्वामी, कृष्णा महाराज हारदे,‎ भगवान महाराज जंगले शास्त्री,‎ गहिनीनाथ महाराज आढाव, परमेश्वर‎ महाराज खोसे याचे दररोज ७ ते ९ या‎ वेळेत कीर्तन होणार आहे. १३ फेब्रुवारी‎ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत‎ शिवाजी महाराज देशमुख नेवासे,‎ ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांचे‎ काल्याचे कीर्तन होणार आहे. कौठा,‎ रस्तापूर, फत्तेपूर, कारेगाव, चांदा‎ परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा‎ लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर‎ भजनी मंडळ रस्तापूर यांनी केले आहे.‎ श्रीक्षेत्र देवगड पिठाचे महंत गुरुवर्य‎ भास्करगिरीजी बाबांचे या सप्ताहाच्या‎ दरम्यान पहिल्या दिवशी ६ फेब्रुवारी ला‎ रस्तापूर येथे मिरवणूक काढली जाईल.‎

बातम्या आणखी आहेत...