आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधान्य पुरवठ्यापासून वंचित रेशनकार्ड धारक कुटुंबांना तातडीने धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नेवासे तालुका काँग्रेस कमिटीकडून निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर असे कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड असुन देखील त्या कुटुंबास रेशन मिळत नाही. यामध्ये प्रामुख्याने विभक्त रेशनकार्डधारक असून एकत्रित कुटुंब असताना रेशनकार्ड धारकास मूळ रेशन कार्डवर धान्य लाभ मिळत होता. परंतु विभक्त होताच त्यास धान्य लाभ मिळत नाही. याशिवाय कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे धान्य पुरवठा बंद करण्यात आला. परंतु कोरोना महामारीनंतर हे कुटुंब परत गावी आले आहेत. त्यांच्याकडे रेशनकार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. लग्न झालेल्या मुलीचे नाव ऑनलाईनमध्ये समावेश होण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय लहान मुलांचे नाव देखील समावेश होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हे सर्व घटक धान्य लाभापासून वंचित आहेत. नेवासे काँग्रेसने याची सखोल माहिती घेऊन व दखल घेऊन नेवासे येथे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. ऑनलाईन मंजुरी घेऊन वंचित कुटुंबांना धान्य पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात वेळीच प्रशासनाने यावर अंमलबजाणी न केल्यास नेवासे तालुका काँग्रेस वंचितासह तहसीलवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार आहे. यावेळी नेवासे काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना आदेश देऊन रेशनकार्ड संदर्भात एकत्रित ठराव घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी नेवासे काँग्रेसचे सतीश तऱ्हाळ, संदीप मोटे, संजय होडगर, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मुसा बागवान, अध्यक्ष रंजन जाधव, इम्रान पटेल, मुन्ना आतार, सचिन बोर्डे, शंकर शेंडगे, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, मीराताई वडागळे, शोभा बोरगे, ज्योती भोसले, शाम मोरे, सौरभ कसावणे आदी सदस्य उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.