आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:रयतसेवक निवृत्तीनंतरही समाज जीवनात अग्रेसर; श्रीगोंदे येथे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस यांचे प्रतिपादन

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रयतसेवक जीवनामध्ये विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिक असतोच तसेच सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जीवनात नेहमी अग्रेसर असतो. त्यामुळे तो कधीही सेवानिवृत्त होत नाही. त्यांचे कार्य अखंडपणे चालू असते असे विचार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदे येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात सेवानिवृत्त सेवकांचा शुभचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. सेवानिवृत्त उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, उपशिक्षक सुधाकर जानराव व मंगल लोकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. रयत बँकेच्या वतीने चांदीचे नाणे देऊन शाखाधिकारी संपत भुजबळ व प्रा. शहाजी मखरे यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या सेवकांच्या कामाची प्रशंसा केली. उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर तथा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तुकाराम कन्हेरकर यांनी निवृत्त सेवकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्या समितीचे पोपटराव खेतमाळीस, जनरल बॉडी सदस्य सुभाष गांधी, बाजीराव कोरडे कुंडलिकराव दरेकर, कार्यकारी संचालक सुनील थोरात, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, सुयश जानराव, पौर्णिमा करंदीकर यांनी सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेमध्ये लाइफ वर्करपदी निवड झालेल्या राजेंद्र खेडकर यांचा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, वंदना नगरे, रवीशेठ दंडनाईक माजी प्राचार्य एम. एस. लगड, रंगनाथ राजापुरे, सतीश जगताप, अशोक राठोड, विमल जगताप, खंडू बोठे, उत्तम बुधवंत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...