आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करून गाठा यशाची शिखरे ; मुलाखतकार व निवेदिका स्मिता गुणे यांचे आवाहन

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सर्वोत्तम कामगिरीबद्दल ख्यातनाम ठरलेले सचिन तेंडुलकर, शुभनम गिल, कविता राऊत हे सारेच सर्वसाधारण घरातूनच जन्माला आले आहेत. पण माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे, हे सूत्र डोळ्यापुढं ठेवून खडतर परिश्रमाने त्यांनी आज यशाची शिखरे गाठली. आपणही सर्वसामान्य कुटुंबातूनच जन्म घेतला आहे. मात्र त्यांच्यात असलेली जिद्द व चिकाटी तुम्ही अंगी बानली व आवश्यकतेनुसार मेहनत घेतली तर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हीही कर्तृत्व सिद्ध करून यशाची शिखरे गाठू शकतात, असा विश्वास मुलाखतकार व निवेदिका स्मिता गुणे यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित अगस्ति विद्यालयाच्या कै. गंगाधर (काका) नाईकवाडी व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफताना विद्यार्थ्याना संबोधित करताना गुणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अगस्तीचे निवृत्त मुख्याध्यापक मनाजी आव्हाड हे होते. कार्यक्रमास अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, अध्यक्षा शैलजा पोखरकर-नाईकवाडी, मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ आदी उपस्थित होते. स्वागत घनश्याम माने यांनी केले. प्रास्तविक उपमुख्याध्यापिक सुजल गात यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत जाधव यांनी केले. गुणे म्हणाल्या, आपले कर्तृत्व महत्त्वाचं आहे, कुठं जन्माला आलो हे नाही. प्रतिभा कुठेही जन्म घेते. तीस गरीब, श्रीमंत व खेडे, शहर हा भेद मान्य नाही. आपल्यातील प्रतिभा आपणांस ओळखावी लागेल आणि खडतर परिश्रम घेऊन आपण स्वतःच स्वतःची ओळख निर्माण करावी, असेही निवेदिका स्मिता गुणे यांनी स्पष्ट केले. आभार शिक्षिका सुनिता नाईकवाडी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...