आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व हिंदू परिषद:घरच्यांच्या पाठबळावर गाठले यशोशिखर

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. एखाद्या क्षेत्रात उच्चतम यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असणे, सातत्यपूर्ण प्रयत्न,सचोटी व नैराश्यमुक्त जीवन जगणे हे आवश्यक आहे मित्रांबरोबर ज्ञानाचे आदान-प्रदान करणे व घरच्यांचे असलेले पाठबळ यामुळेच आम्ही हे यशाचे शिखर गाठू शकलो, असे प्रतिपादन २०२१ या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी) अनुक्रमे भारतात ३२ व ७८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले नगरचे युवक संदीप कारभारी शिंदे व गिरीश हरिभाऊ पालवे यांनी केले.

नगरच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या दोघांचा या उतुंग यशाबद्धल विशेष सत्कार करण्यात येऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विश्व परिषदेचे कोषाध्यक्ष मुकुल गंधे, मंदिर मठ समितीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे, मनोहर भाकरे, जिल्हा सहमंत्री, गौतम कराळे, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर व प्रखंड मंत्री दिनेश परदेशी यांनी या युवकांच्या गुलमोहर रस्त्यावरील निवासस्थांनी जाऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. गिरीश व संदीप यांना निसर्ग व पर्यावरणाविषयी विशेष आपुलकी आहे. या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जिथे असेल तिथे जनसेवा प्रकल्प राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

युवकांचे यश प्रेरणादायी
या युवकांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून मिळवलेले यश हे सर्वांना प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. नगरकरांसाठी एक मानाचा तुरा या युवकांनी रोवला आहे. भविष्यातही त्यांच्या कडून निश्चितच चांगली कामगिरी होईल व देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासकीय सेवेत चांगला हातभार लावतील, अशी आशा मुकुल गंधे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...