आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर निकालाचा धक्का बसला नाही असेच सांगितले याचा अर्थ त्यांना अगोदरच हे अपेक्षित होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने व काँग्रेसने स्वतःचे उमेदवार सुरक्षित ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला वाऱ्यावर सोडून दिल्याचे हे त्यांच्या मतावरून सिद्ध होत आहे.अशी टीका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, राज्यसभेचा निकालाचा धक्का सर्वांनाच बसला. शिवसैनिकांबरोबरच मुख्यमंत्र्यांना देखील तो धक्का बसला मात्र आम्हाला आनंदाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हा निकाल अपेक्षित असल्याचे म्हटले आहे याचा अर्थ असा की स्वतःहा मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा निवडणुकीत लागली होती. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसनेने शिवसेनेला वाऱ्यावर सोडल्याचे त्यांच्या मतांवरून सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी बरोबर असणे हीच मोठी चूक आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार आहे गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीत जे प्रवेश झाले ते शिवसेनेचे झाले आहेत. ते कागदावर आहेत मी हवेत बोलत नाही. असे डॉ.विखे म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत मूळ षड्यंत्र कोणाचे होते हे मी सांगण्याची गरज नाही.
फडणवीस यांच्या रणनीतीचे यश
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या रणनीतीचे यश आहे. राज्यसभा निवडणूक वैचारिक व नियोजनबद्ध कशी लढवली जाते हे या निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोप निवडणुकीनंतर होत राहतात. त्यांचे मंत्री 100 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. मुंबई महापालिकेच्या 1 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे.असे फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितले आहे. असे डॉ. सुजय विखे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.