आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिक ग्रंथ वाचन करणे ही आपली संस्कृती आहे. जनसामान्याचे तसेच गावातील लोकांचे बांधावर जाऊन भावकीतील आपसातील वाद मिटवण्याचे काम सुर्यकांत पाऊलबुद्धे यांनी केले. हे समाजसेवेचे काम त्यांनी अविरत चालू ठेवावे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी सूर्यकांत पाऊलबुद्धे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त समारंभाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ. घुले बोलत होते.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले,अशोक महाराज बोरुडे, नवनाथ महाराज काळे, बाजार समिती सभापती अॅड. अनिल मडके, सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख, सरपंच सुनिता कांबळे, मिलिंद कुलकर्णी, विष्णू जगदाळे, प्रा. के. वाय. नजन, रामनाथ राठी, रांजणीचे सरपंच प्रा. काकासाहेब घुले, मेहबूब शेख, सुभाष पवार, प्रा. टी. बी. जाधव, जिजामाता पतसंस्थेचे अध्यक्ष कडूबाळ घुले, रामकिसन जाधव, बाळासाहेब मरकड, रावसाहेब मरकड, प्रा. अशोक नरवडे, ग्रामविकास अधिकारी बटूळे, संतोष काळे आदी उपस्थित होते.
डॉ. अरुण पवार, विलास लोखंडे, प्रा. काकासाहेब घुले, संजय चव्हाण, बाळासाहेब काळे, राम शिदोरे, प्रा. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शाखा अधिकारी पाऊलबुध्दे यांचा सेवापूर्तीनिमित्त डॉ. नरेंद्र व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक विलास लोखडे यांनी, सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मंडलिक व प्रा. मकरंद बारगुजे यांनी, तर अाभार रामभाऊ पाऊलबुध्दे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.