आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक निवडणूक:विक्रमी 466 उमेदवारी अर्ज दाखल ; शिक्षक बँक निवडणूक

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जिल्हाभरातून तब्बल १ हजार ८५ अर्जांची विक्री झाली असून ४६६ अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी २४ जूनला होणार असली तरी माघारी नंतरच रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

बँकेचा गड काबीज करण्यासाठी सदिच्छा, रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळ, बापू तांबे गटाचे गुरूमाऊली मंडळ, ऐक्य, गुरुकुल मंडळ, बहुजन मंडळ यासह विविध संघटनानी शडू ठोकले आहेत. निवडणुकीसाठी १७ जूनपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपासून अर्जदाखल होण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

सर्वच मंडळांनी जिल्हा पिंजून काढला असून तालुकानिहाय बैठका व मेळावे आटोपले आहेत. इच्छूक उमेदवारांचे अर्ज अगोदरच नेत्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच विकास मंडळ निवडणुकीसाठीही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस मुदत असल्याने अर्जांची संख्या वाढणार आहे. बँकेसाठी २१ पैकी अनुसुचित जाती जमाती १, महिला राखीव २, इतर मागासप्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती, जमाती, वि. मागास प्र. प्रतिनिधीसाठी १ या राखीव व १६ सर्वसाधारण जागा आहेत. सर्वसाधारण जागेसाठी संगमनेर ३२, नगर ११, पारनेर २१, कोपरगाव १५, राहाता २१, श्रीरामपूर २६, जामखेड २१, पाथर्डी २९, राहुरी १५, शेवगाव १६, श्रीगोंदे १९, अकोले १५, नेवासे २२, कर्जत १९ अर्ज सर्वसाधारण जागेसाठी दाखल आहेत. तर राखीव अनु. जाती, जमाती २४, महिला राखीव ४९, इतर मागास प्रवर्ग ५५, विमुक्त जा., भ. ज. विशेष मा. प्रतिनिधी ४३ अर्ज दाखल आहेत.

मंडळांकडून जास्तीचे अर्ज गुरूमाऊली मंडळाच्या तांबे गटाकडून विकास मंडळासाठी ९२ तर शिक्षक बँकेसाठी ११७ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच सदिच्छा मंडळ बँकेसाठी १०० तर विकास मंडळासाठी ३८, बहुजन मंडळाकडून बँकेसाठी सुमारे ७५ तर विकास मंडळासाठी ३५ अर्ज दाखल झाले. गुरूकुल मंडळाने बँकेसाठी १५० तर विकास मंडळासाठी १०० अर्ज दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...