आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम:लॉकडाऊनचा सदुपयोग करत 16 व्या वर्षी सायकलिंगमध्ये विक्रम

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लॉकडाऊनमुळे जगात सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. या काळात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचं वातावरण होतं. मुले मोबाइलवर गेम खेळण्यात दंग होती, पण याच लॉकडाऊनमध्ये आशेचा किरण शोधून संगमनेरच्या १६ वर्षीय पार्थ तवरेजने सायकल चालवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी होऊन त्याने पहिल्याच प्रयत्नात औरंगाबाद ते सोलापूर व सोलापूर ते औरंगाबाद हे अंतर ५२० किमीचे अंतर ३० तासांत पार केले.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. अलगीकरण, विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या गोष्टींमुळे १६ ते २५ वयोगटातील लोकांना याचे परिणाम जास्त प्रमाणात भोगावे लागले, असा अंदाज पॉझिटिव्ह व्ह्यू फाऊंडेशन संस्थापक अँड्यू पेज यांनी वर्तवला आहे. लॉकडाऊनमध्ये मुले मोबाइलप्रेमी झाली होती. पण संगमनेरच्या पार्थ सचिन तवरेज याने त्या काळात सायकल चालवण्याचा ध्यास घेतला. तो सुरुवातीला संगमनेर परिसरातील घाटात साध्या सायकलीने चालवायला लागला. त्यानंतर तो हळूहळू मित्रासोबत ५० किमीपर्यंत सायकल चालवू लागला. एकेदिवशी त्याने ११० किमीपर्यंत पहिली मोठी राईड पूर्ण केली. त्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला की आपण काहीतरी वेगळे करू शकू. पण घरच्यांनी दहावीचे वर्ष असल्याने त्यास सायकलिंग करण्यास विरोध केला. त्याचवेळी त्याच्या मित्राने सायकलिंगमध्ये ४५० किमीचा विक्रम केला. त्या मित्रापासून त्याने प्रेरणा घेत त्याने आपणही मोठ्या सायकल स्पर्धेत सहभाग घेऊन विक्रम करू शकतो. यासाठी त्याने यूट्यूब वर त्याचे रोल मॉडेल असलेल्या सायकलपटूंचे पेज फॉलो केले. त्यासाठी आई-वडील यांचेही त्याला मार्गदर्शन त्याला मिळाले.पार्थने २८ मे रोजी औरंगाबाद ते सोलापूर आिण सोलापूर ते औरंगाबाद हे ५२० किमीचे अंतर अवघ्या ३० तासांत पार केले.

मी १४ वर्षांचा असल्यापासून सायकल चालवतोय. सायकलवर माझं इतकं प्रेम आहे, की इतर स्टायलिश बाइकचं आकर्षण वाटतच नाही. सुखकर, हलके, विना कटकटीचे, विना प्रदुषणाचे, तब्येतीला चांगले असे वाहन असल्याने सायकल चालवण्यात जी मजा आहे, ती दुसऱ्या कशातच नाही. मग अंतर जवळचं असो वा दूरचं, असे पार्थ सांगतो.

शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते लॉकडाऊन काळात मला घरात राहायला आवडत नव्हते. त्यामुळे मी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला. सायकलिंगमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते. सायकल हा कमी खर्च, सोपा व्यायाम व कधीही व कुठेही चालवता येते. '' पार्थ तवरेज, सायकलपटू, संगमनेर.

मोबाइलमुळे निर्माण होता मानसिक तणाव
मोबाइलची मलाही आवड होती, त्यातील गेम आवडायचे पण सारखे मोबाइलवर गेम खेळत असल्याने मानसिक तणाव यायचा. घरात राहण्याचा कंटाळा आल्याने सायकलिंगकडे वळालाे. सायकलिंगच्या बीआरएम किंवा ६०० किमीच्या स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा होती पण वयामुळे त्यात भाग घेऊ शकलो नाही, असेही तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...