आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:तरुण शेतकऱ्याने घेतले मिरचीचे विक्रमी उत्पादन‎ ; माजी आमदारनी केली पाहणी‎

सोनई‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलते हवामान, वाढती मजुरी,‎ नेहमी पडनारे पिकाचे भाव यामुळे ‎शेतकरी बांधवांना शेती करणे‎ जिकिरीचे झाले आहे. त्यातही तरुण ‎ ‎ मुले शेती करण्यास धजवत नाही, हे चित्र नेहमी पाहण्यास मिळते. या ‎सर्वांवर मात करणारे आशादायक‎ चित्र बेलपिंपळगाव परिसरात‎ पाहण्यास मिळत आहे.‎ नेवासे तालुक्यातील‎ बेलपिंपळगाव येथील महेश‎ सखाहरी शिंदे हा तरुण शेतकरी‎ गेल्या पाच वर्षांपासून अवघ्या १५ ‎गुंठ्ठ्यांत लाखो रुपयांचे उत्पादन‎ कलश शिवगामिनी या वाणाच्या‎ लवंगी मिरचीचे घेत आहे.

यावर्षी‎ अवघ्या अडीच ते तीन महिन्यात १५‎ गुंठे क्षेत्रात ५ लाख रुपयांचे उत्पादन‎ घेतले असून अजूनही २ ते ३ लाख‎ रुपयांचे उत्पादन मिळणे अपेक्षित‎ आहे. कमी खर्चात योग्य‎ व्यवस्थापन करत लाखो रुपये‎ मिळवून देणाऱ्या या शेती प्लॉटची‎ माजी आमदार भानुदास मुरकुटे‎ यांनी भेट देत पाहणी केली. महेश‎ शिंदे यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे‎ व नियोजनाचे कौतूक केले. यावेळी‎ पंचायत समिती सदस्य रवींद्र‎ शेरकर, अशोक कारखान्याचे‎ संचालक अमोल कोकणे, माजी‎ उपसरपंच बेलपिंपळगाव बंडू‎ चौगुले, ग्रामपंचायत सदस्य तथा‎ घोगरगाव पाणी योजनेचे उपाध्यक्ष‎ कृष्णाराव शिंदे, सखाराम कांगुणे,‎ वसंतराव कांगुणे, सखाहरी शिंदे,‎ महेश शिंदे आदी उपस्थित होते.‎ महेश शिंदे म्हणाले, मंत्री शंकरराव‎ गडाख, माजी आमदार भानुदास‎ मुरकुटे, प्रशांत गडाख, उदयन‎ गडाख यांचे मला पाठबळ मिळते.‎ बेलपिंपळग येथे मिरची पिकाची पाहणी करताना माजी आमदार भानुदास मुरकुटे आदी.

बातम्या आणखी आहेत...