आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेतील सरळ सेवेतील कर्मचारी भरतीपैकी १० टक्के नोकर भरती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून केली जाते. या भरतीतील वशीलेबाजी होत असल्याचा आरोप करत पात्र कर्मचाऱ्यांना निवडीसाठी आमंत्रित करावे, या राणिसती आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. सुधीर टोकेकर, ज्ञानदेव नरोटे, संतोष आल्हाट, सुर्यकांत आव्हाड, रामदास वाघमारे, विजय शिंदे, सोमनाथ गोल्हार, अनिल नेटके, मच्छिंद्र शिंदे, सविता गोसावी, ज्ञानदेव ढवळे, सुनील शिंदे, रामनाथ खेडकर, गणेश साळुंके आदी उपस्थिती होते. जिल्हा परिषदेत सरळ सेवतून १० टक्के नोकर भरती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून व्हावी, यासाठी ज्येष्ठता यादी तयार केली आहे.
या यादीवर हरकती मागवल्यानंतर, अंतिम यादी १६ फेब्रुवारीला जाहीर केली. या यादीतून जिल्ह्यातील ३५ कर्मचाऱ्यांना १५ मार्चला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले आहे. अंतिम यादीत अकोले तालुक्यातील दहा कर्मचारी बाकीच्या ठिकाणचे दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश नाही. संगमनेर तालुका व शेवगाव तालुक्यातील एकाही कर्मचाऱ्याचे नाव नाही, तसेच एकाही महिलेचे यात नाव नाही. नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथील गोसावी समाजातील भटक्या जमाती प्रवर्गातील महिलेचे नावही या यादीत नसल्याने तक्रारी होत आहेत. संघटनेच्या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांना देऊन चर्चा केली. त्यावर शिंदे यांनी अजूनही हरकती नोंदवता येणार आहेत. कोणाचे कागदपत्र व अपुरी माहिती असेल तर ती दाखल करावी, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.