आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:पोलिस शिपाई पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुसर्‍या दिवशीही पोलिस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी ३२६ उमेदवारांनी हजेरी लावली. यातील ४८ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीमध्ये बाद ठरविण्यात आले. उर्वरित २७८ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. दरम्यान दुसर्‍या दिवशी ५५९ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी ३२६ जण हजर राहिले तर २३३ जणांनी दांडी मारली. दरम्यान, आजपासून पोलिस शिपाई जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

नगर जिल्ह्यातील १३९ जागांसाठी १२ हजार ३३४ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी २०० उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. यातील ४८ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरविण्यात आले. मंगळवारी ३२६ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. स्वत: पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक कमलाकर जाधव, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. दरम्यान आजपासून पोलिस शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...