आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत-जास्त नोंदणी करा : पांगारकर

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या मतदारसंघावर अनेकदा भाजपाने विजय मिळवला आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे आणायचा आहे. १ ऑगस्टपासून परिसरातील पदवीधरांची जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन शुक्रवारी भाजपचे अहमदनगर जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांनी केले.

अहमदनगर शहर भाजप पक्ष कार्यालयात जिल्हा प्रभारी पांगरकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे होते. यावेळी मनोज पांगरकर यांनी नगर शहर व दक्षिण जिल्हा नोंदणी प्रमुख म्हणून अॅड. विवेक नाईक यांची नियुक्ती केली. या बैठकीस ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस महेश नामदे, उपाध्यक्ष सचिन पारखी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकटी, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, बाबासाहेब सानप, अनिल गट्टाणी आदींसह पाधिकारी उपस्थित होते.

पांगारकर म्हणाले,अहमदनगर शहर व जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी होण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वतः पासून नोंदणी सुरू करा. डिसेंबर २०२३ मध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे या नोंदणीच्या निमित्त तुमचाही घराघरात संपर्क होईल. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी, तर आभार महावीर कांकरिया यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...