आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निवीर'साठी 68 हजार तरुणांची नोंदणी:मेजर जनरल अजय सेठींची माहिती, राहुरीतील आर्मी भरती मेळावा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... तरुणांची

भारतीय सैन्य दलाच्या पुणे विभागीय भरती केंद्राच्या वतीने पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यातील तरूणांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘अग्निवीर' भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या ‘अग्निवीर’ भरती मेळाव्यासाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील तरूणांकडून https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 68 हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती सोमवारी भरती प्रक्रियेचे अतिरिक्त महासंचालक तथा मेजर जनरल अजय सेठी यांनी दिली.

पाच राज्यात आठ भरती मेळाव्यांचे आयोजन

राहुरी कृषी विद्यापीठात सुरु असलेल्या भरती मेळाव्याला सोमवारी सेठी यांनी भेट दिली. यावेळी अजय सेठी म्हणाले की, भारतीय संरक्षण दलाने जाहीर केलेल्या ‘अग्नीवीर’ योजनेनुसार देशभरात ‘अग्निवीर’ भरती मेळावे घेण्यात येत आहेत. पुणे संरक्षण दलाच्या भरती विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा-नगर हवेली, दमण-दीव या राज्यातील तरूणांसाठी 7 पुरूष व 1 महिला असे एकूण 8 भरती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सध्या औरंगाबाद व राहूरी येथे पुरूष मेळावे सुरू आहेत.

68 हजार तरूणांनी नोंदणी केली

राहूरी भरती मेळाव्यासाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील तरूणांकडून ​​​​​​​ https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 68 हजार तरूणांनी नोंदणी केली. या सर्व तरूणांना ऑनलाईन प्रवेशपत्र वितरित करण्यात येऊन प्रत्यक्षात राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर 23 ऑगस्ट पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज सुमारे 4 ते 5 हजार तरूणांची भरतीसाठी पडताळणी करण्यात येत आहे. 11 सप्टेंबर पर्यंत ही भरती चालणार आहे. असे सेठी यांनी सांगितले.

‘अग्निवीर’ भरतीत जास्तीस जास्त तरूणांनी सहभागी व्हावे

शिस्त, सचोटी व प्रामाणिकपणा हे ‘अग्निवीरां’मध्ये रूजणार आहेत. या सर्व भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते इतर सर्व चाचण्यांसाठी तरूणांकडून कोणतेही शुल्क न घेता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘अग्निवीर’ भरतीत जास्तीस जास्त तरूणांनी उत्साह व उर्जेने सहभागी व्हावे. असे आवाहन सेठी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...