आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेसह आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कायाकल्प पुरस्कार जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जाहीर झाले आहेत. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ब्राम्हणवाडा व चास आरोग्य केंद्राला यापूर्वीच प्राप्त झाला आहे.महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने कायाकल्प पुरस्कार योजना राबवण्यात येत आहे.
शासनाकडून सार्वजनिक आरोग्य सुविधांमद्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प पुरस्कार योजनेंतर्गत उत्कृष्ट उपाययोजनांवर आधारीत पुरस्कृत कार्यात येते. राज्य व केंद्रिय मार्गदर्शक तत्वानुसार कार्यात आले.
राज्यातील ४६३ आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ४६ केंद्रांचा समावेश आहे. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा व नगर तालुक्यातील चास केंद्राने जिल्हातर्गत एक लाखांचा पुरस्कार पटकावला तर उर्वरीत ४४ केंद्रांना ५० हजारांचा पुरस्कार मिळणार आहे.
पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्र : चास, रुईछत्तीसी, वाळकी, टाकळी काझी, टाकळी खातगाव, मेहेकरी (नगर), कान्हूर पठार, खडकवाडी, निघोज, रूईछत्रपती, अळकुटी, पळवे खु. (पारनेर), उंबरे, टाकळीमिया, गुहा, मांजरी (राहुरी), बोटा, चंदनापुरी, धांदरफळ, निमगाव जाळी (संगमनेर), लोणी व्यकनाथ, आढलगाव, बेलवंडी, कोळगाव (श्रीगोंदे), बेलापूर खु. माळवडगाव, टाकळीभान, निमगाव खैरी (श्रीरामपूर), ब्राम्हणवाडा, विठा, म्हाळादेवी (अकोले), उस्थळ दुमाला, चांदा, नेवासा बु. (नेवासे), खरवंडी कासार, तिसगाव, माणिकदौंडी (पाथर्डी), कोल्हार बु., दाढ बु. सावळी विहीर (राहाता), कुळधरण, बारडगाव सुद्रिक (कर्जत), हातगाव नगर, दहिगाव ने (शेवगाव), अरणगाव (जामखेड), दहिगाव बोलका (कोपरगाव).
राष्ट्रीय स्तरासाठी तयारी
राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले असले, तरी आता पुढील टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची तयारी सुरू कार्यात आली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांनी बैठका घेतल्या आहेत. तालुकानिहाय तीन आरोग्य केंद्राची त्यासाठी निवड कार्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.