आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर:रेखा जरे हत्याप्रकरणी आरोपी न्यायालयीन कोठडीत, बाळ बोठेच्या अर्जावर सोमवारी सुनावणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेखा जरे हत्या कटातील आदित्य चोळके, ॠषिकेश पवार व सागर भिंगारदिवे या आरोपींची कनिष्ठ स्तर न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी इतर दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.

आरोपींना न्यायालयासमोर सादर करताना तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील अनुपस्थित असल्यामुळे चोेळकेचे वकील व्यंकटेश खिस्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले. सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी बाजू मांडली. जरे यांची हत्या झाली त्या दिवशी पवार हा ज्ञानेश्वर शिंदे व फिरोज शेखच्या संपर्कात होता. मात्र, तपास यंत्रणेला तो माहिती देत नाही. चोळकेस सुपारीपोटी मिळालेली रक्कम काही प्रमाणात हस्तगत झाली. उर्वरित रकमेची विल्हेवाट कोठे लावली हे तो सांगत नाही.

चोळके हा शिंदे व शेख यांना जरे यांचे लोकेशन देत होता. शिंदे, चोळके, शेख यांनी भिंगारदिवेेची कोठे भेट घेतली याचे पुरावे शोधायचे आहेत. मुख्य आरोपी बाळ बोठेचा शोध लागल्यानंतर सर्व आरोपींसमवेत चौकशी करून हत्येचे कारण काय आहे याचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी भोसलेंनी केली. त्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

बाळ बोठेच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी
मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती, पण तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांचे म्हणणे दुपारपर्यंत सादर झाले नव्हते. तत्पूर्वी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील न्यायालयात हजर झाले. त्यांनी सुनावणी सोमवारी (१४ डिसेंबर) ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser