आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा जरे खून प्रकरण:रेखा जरेंच्या हत्येची दिली होती सुपारी; पोलिसांनी तिघांना केली अटक, मास्टरमाइंडचा शोध सुरू

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी पुण्याहून नगरकडे येत असताना जातेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर झाला होता हल्ला

राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी सुपारी घेऊन रेखा यांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून रात्री दोघांना आणि कोल्हापूर येथून एकाला अटक करण्यात आली आहे. आता पोलिस मास्टर माइंडचा शोध घेत आहेत.

रेखा जरे या सोमवारी रात्री पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. त्यांच्यासोबत गाडीत मुलगा, आई व नगर मधील त्यांची एक मैत्रीण असे चौघेजण होते. जातेगाव घाटात एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीला कट मारला. नंतर गाडीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. जरेंची गाडी थांबल्यानंतर दुचाकीस्वारांनी जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची सुरू असतानाच, एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. हल्ल्यात गंभीर झालेल्या जरे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे आणण्यात आले. मात्र तोपर्यंत जरे प्राणज्योत मावळली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser