आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा जरे हत्या प्रकरण:पत्रकार बाळ बोठेनेच दिली रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देण्याचे कारण अजूनही अस्पष्ट

अहमदनगर जिल्ह्यातील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या पत्रकार बाळ ज. बोठे याने सुपारी देऊन केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. बोठे फरार असून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत.

कारण अजूनही अस्पष्ट

बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देण्याचे कारण अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान, बोठे याने हनी ट्रॅप नावाने चालवलेल्या वृत्तमालिकेतून अनेक दिग्गजांची नावे समोर आली होती. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

सोमवारी रात्री पुण्याहून कारने नगरला येताना जातेगाव घाटात (ता. पारनेर) दुचाकीवर आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने जरे यांची गळा चिरून हत्या केली होती. मंगळवारी रात्री फिरोज राजू शेख (२६, रा. संक्रापूर, ता. राहुरी) व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (२४, रा. कडीत, फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) तसेच आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर हत्येमागील सूत्रधारांचा पर्दाफाश झाला. यानंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे (३१, रा. शास्त्रीनगर, केडगाव) व ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार (वय २३, प्रवरानगर, ता. राहाता) यांना अटक केली आणि सूत्रधार सापडला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser