आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:रेल्वे स्टशेशन परिसरात सासरच्या लोकांनी केली जावयासह नातेवाईकांना मारहाण

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावयासह त्याच्या आई व चुलतीला सासूरवाडीच्या १० जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी रेल्वे स्टेशन येथील जंगम वस्तीवर घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन सुरेश जंगम (वय ५५ रा. जंगम वस्ती, रेल्वेस्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा गोविंद जंगम व जाऊ मिना बाबु जंगम यांना मारहाण केली आहे.

गोविंदची पत्नी रेखा गोविंद जंगम (रा. जंगम वस्ती, रेल्वेस्टेशन), सासू जनाबाई भाऊसाहेब पवार (रा. चाणक्य चौक, नगर), मेव्हणी जयश्री कैलास गायकवाड (रा. बुरूडगाव रोड, नगर), मंगल चंद्रकांत धोत्रे, शितल कचरू फुलारे (दोघे, रा. केडगाव), लखन भाऊसाहेब पवार, अनिता लक्ष्मण शिंदे, सुरेखा अजिनाथ पवार (तिघे रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ, नगर), सुनीता अर्जुन गायकवाड (रा. पाईपलाइन रोड, सावेडी), रूपाली राजु पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...