आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट टुगेदर:एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा; माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे मत

देवळाली प्रवरांएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेट-टुगेदर साजरा केल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो तसेच त्यामधून पुढील पिढीला प्रोत्साहान मिळते, असे गौरवोउद्गार माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी काढले.देवळाली प्रवरा येथील श्रीछत्रपती शिवाजी माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयातील सन १९७९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस देवळाली प्रवस नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम उपस्थित होते. यावर्षी नानासाहेब पुंजाजी कदम यांच्या वस्तीवर हा गेट टू गेदर कार्यक्रम पार पडला. गेल्या ४३ वर्षांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमासाठी देवळाली प्रवराचे भूमिपुत्र व पुणे येथील राजपथ इन्फाचे तथा दौंड शुगर कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम उपस्थित होते. उद्योजक जगदीश कदम म्हणाले, आम्ही सर्व मित्र ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्ही सर्वजण कुठल्या न कुठल्या क्षेत्रामध्ये नावलौकीक करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, तुम्ही सर्वजण खरोखर भाग्यशाली आहात. गेली १५ ते १६ वर्षांपासून तुम्ही सर्व वर्गमित्र दरवर्षी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात. त्यांचा खरोखर सर्वांनी आदर्श घ्यावा व येथून पुढे देखील तुम्ही सर्वांनी असाच कार्यक्रम सुरू ठेवावा. सन २००५ पासून आजतागायत आम्ही एकत्र येतो. सर्व वर्गमित्रांना जगदीश कदम यांनी स्वखर्चाने नोव्हेंबर २०१९ मध्ये दुब येथे परदेश वारी घडवून आणली होती.

बातम्या आणखी आहेत...