आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार विखे यांचे शिवसेनेला आव्हान:उरलेल्या खासदारांनी मोदींच्या फोटोशिवाय निवडणूक लढवावी

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर खासदारांनी राजीनामा द्यावा असे आव्हान शिवसेनेने केल्याच्या मुद्द्यावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सध्या शिवसेनेमध्ये उरलेल्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोशिवाय निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे.

विखे म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणुकांदरम्यान शिवसेनेने मोदी यांचा फोटो मोठा करून दाखविला. शिवसेनेच्या पत्रके, फ्लेक्सवर उमेदवार दिसत नव्हता एवढा मोठा मोदींचा फोटो होता. लोकसभेच्या वेळी तर आवर्जुन त्यांनी मोदींचे फोटो लावले. त्यांना माहिती होते की, मोदींची सध्या लाट आहे. आमचे प्रतिआव्हान आहे की, शिवसेनेच्या उरलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन एक तरी निवडणूक मोदींच्या फोटो शिवाय लढवून दाखवावी, असे ते म्हणाले. आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मतदान पडण्याचा काळ गेला. स्वकर्तृत्त्वावर आपले स्थान निर्माण करावे लागते, असे ते म्हणाले.

कोकणाच्या बाहेर पाहिलेच नाही
ठाकरे कुटुंब कोकणाच्या बाहेर पडलेले पाहिलेच नाही. शिवसेनेला महाराष्ट्रात भाजपच्या जीवावर सत्ता मिळाली होती. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील योजनांकडे पाहून शिवसेनेला मत मिळाली. आमचे एकत्रित १६५ आमदार निवडून आले, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...