आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथविक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोचीगल्ली व घासगल्ली परिसरातील हॉकर्सचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या सदस्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन दिल्यानंतर हॉकर्स बांधवांनी महापालिकेत ठिय्या दिला. आंदोलनात साहेबान जहागीरदार, राजू खाडे, रमेश ठाकूर, नंदकुमार रासने, नवेद शेख, अनिल ढेरेकर, संतोष रासने, फिरोज पठाण, नितीन नाळके, कल्पना शिंदे, गफ्फार शेख, दत्ता शिंदे, मीनाक्षी शिंगी, कमलेश जव्हेरी, लंकाबाई शेलार, इंद्रभान खुडे, रमीज सय्यद, कमरुद्दिन सय्यद, सादिक खान आदींसह हॉकर्स सहभागी झाले होते.
हॉकर्स मागील तीस ते चाळीस वर्षांपासून बाजारात स्टॉल लावतात. या हॉकर्सना मागील पंधरा दिवसापासून स्टॉल लावण्यापासून रोखण्यात आले. लवकरच रमजान महिना सुरु होत असून, हा वाद न वाढविता पर्याय शोधावा. जातीय राजकारण न आणता हॉकर्सची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हॉकर्सचे पुनर्वसन बाजारपेठेच्या परिसरातच करण्याचा विचार करावा, असे निवेदनात म्हटले. दरम्यान, हॉकर्स संघटनेची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.