आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य मजबूत:देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतीविरांचे स्मरण करा : जसवाल

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून आपण आपले स्वातंत्र्य मजबूत केले पाहिजे. आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी कर्नल संजीव कुमार जसवाल यांनी केले.

सावेडीतील श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशालेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कर्नल संजीवकुमार जसवाल व पीएसआय समाधान सोळंके उपस्थित होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. आर. कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य अड. किशोर देशपांडे , खजिनदार सतीशचंद्र कुलकर्णी, शालेय समिती चेअरमन सुरेश क्षीरसागर, कुलकर्णी, माध्यमिक विभागाचे प्राचार्या संगीता जोशी, पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी. एम. कासार आदी उपस्थित होते.प्रमुख अतिथीच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले गेले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थीनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. या गीतासाठी वर्षा खणकर व हर्षद भावे यांनी साथ दिली. प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक डी. एम. कासार यांनी भा. ब. बोरकर यांच्या कवितेच्या ओळी सादर करून प्रास्ताविकाची सुरुवात केली. त्यांनी अमृत महोत्सवाचे भारतीयांसाठी असणारे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून नमूद केले. पीएसआय समाधान सोळंके म्हणाले, देशाचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशाकरीता बलिदान दिलेल्या हुतात्माना सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्याचा पोवाडा संकेत शिंदे व सहकारी शिक्षक यांनी गायला. विविध सांस्कृतिक देशभक्तीपर गीतावर मुलांनी नृत्य केले. विविध देशभक्तांच्या वेशभूषा मुलांनी केल्या. परिचय रघुनाथ चांदेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन जयश्री मुळे व वृषाली कुलकर्णी यांनी केले. फलक लेखन गणेश पारधे, विश्वास शेरकर व स्वाती घुले यांनी केले. पभगवान जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...