आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवंदना:स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण हे कर्तव्यच ; अॅड. मनकर

अकोले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य चळवळीतील योगदान देत देशासाठी कामी आलेले स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यवीर व वीर जवान यांचे स्मरण करणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील वसंतराव मनकर यांनी केले. शनीमंदिर परिसरातील अकोल्यातील काॅम्रेड नबाजी दादा मनकर संकुलातील लक्ष्मीनिवास गृह निर्माण सोसायटीत स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सुधाकर शाळीग्राम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यांना निवृत्त सेना जवानाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अकोले नगरपंचायतच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रतिभा उर्फ उमा मनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक सुधाकर शाळीग्राम, नाण्याबाई देवराम वाकचौरे, सुनीता पद्माकर शाळीग्राम, भागीरथ कृष्णाजी पवार, माजी सैनिक प्रभाकर जगताप, रावसाहेब नवले, अविनाश झोळेकर, संदीप ताजणे व कर्तव्यावरील जवान सचिन आण्णासाहेब नवले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिभा मनकर, नगरसेवक हितेश कुंभार, अशोक नाईकवाडी, संतोष शाळीग्राम, विजय पोखरकर, स्वप्नील कांडेकर, शहबाज लालूशेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...