आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवी जीवनामध्ये सुख-दुःख प्रत्येकाला असते. सुखात असाल तरी उतमात करू नका व दुःखात असताना शोक व्यक्त करू नका. संकटाच्या काळात परमेश्वराचे स्मरण केल्याने ते भक्ताच्या हाकेला धावून येतात व आपल्याला मार्ग दाखवतात. भगवंताचे नाव घेणे सहज शक्य आहे. जीवनात प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने साधुसंतांच्या विचाराने जगावे. या माध्यमातून दुर्गुण नष्ट होण्यासाठी मदत होते, असे निरुपण अजय महाराज बारस्कर यांनी केले.
श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयाेजित हरिनाम सप्ताहाच्या सांगता कीर्तनात मार्गदर्शन करताना बारस्कर महाराज बाेलत हाेते. याप्रसंगी खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, वसंत लोढा, अभय आगरकर, रवींद्र बारस्कर, उदय कराळे, आशा कराळे, दत्ता सप्रे, जालिंदर बोरुडे, मोहनशेठ मानधना, नितीन शेलार उपस्थित होते. बारस्कर महाराज म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी डोंगरावर तपश्चर्या करून पांडुरंगाचे नामस्मरण केले. त्यांनी गोरगरीब दीनदुबळे यांच्यात देव पाहिला व त्यांची आयुष्यभर सेवा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.