आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:नगर शहरात विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवली; मनपा व शहर वाहतूक शाखेची संयुक्त कारवाई

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने मिरवणूक मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मनपा अधिकारी व शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मिरवणुकीस अडथळा होणार नाही, या दृष्टीने रस्त्यावर आलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे कारवाई करून काढण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते यांनी दिली.

बुधवारी सकाळी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियंता सातपुते यांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र खुंट परिसरातून कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रभाकर राकेश कोतकर मेहेर लहारे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, देविदास बिजा, अर्जुन जाधव, अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक पाटोळे व वाहतूक शाखेचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...