आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळे:कोरोना अनुदान वाटपातील अडथळे अडथळे तात्काळ दूर करा

श्रीरामपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोना सानुग्रह अनुदान वितरणाची मंत्रालयीन पातळीवरील सर्व प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे यातील अडचणी तातडीने दूर करून संबंधितांना दिलासा द्या, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीची डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील उपसभापती दालनात या बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या एक ते दीड महिन्यापासून कोरोना सानुग्रह अनुदानाचे संकेतस्थळ व संपूर्ण यंत्रणाच बंद पडली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ठप्प होऊन कोरोना मृतांच्या वारसांची ससेहोलपट होत असल्याकडे मिलिंदकुमार साळवे यांनी उपसभापतींचे लक्ष वेधले.

त्यावर तातडीने ही प्रक्रिया सुरू करावी, कोरोना काळातील ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान ज्या महिलांना अद्याप प्राप्त झाले नाही; त्यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या समन्वयाने अनुदान वितरित करण्यात यावे, ज्या बालकांचा बालसंगोपन योजनेत समावेश नाही, अशा बालकांना या योजनेंतर्गत समावेश करून, प्रतिमाह ११०० रुपये प्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...