आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील ८० टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक ठिकाणी नाल्यांमधून काढलेला गाळ शेजारील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यालगत टाकल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे.
पावसाळा सुरू झाला असला तरी महापालिकेचे नालेसफाईचे काम अद्यापही सुरूच आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत आहे. जूनअखेरपर्यंत बहुतांशी काम मार्गी लागेल, असेही सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अद्यापही गाळ व अॅनिमल वेस्टचा कचरा तसाच पडून आहे. काही ठिकाणी नाल्यांमधून काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.
महापालिकेने नाल्यांमधून काढलेला गाळ उचलण्यासाठी नियोजन न केल्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर त्या नाल्यांमध्ये कचरा व ॲनिमल वेस्ट आणून टाकले जात आहे. अशा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेकडून जवळपास ८० टक्के नालेसफाईचे काम झालेले आहे. ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही, अशा ठिकाणी नाल्यांमधून काढलेला गाळ महापालिका उचलत नाही. फक्त रहिवासी परिसर असलेल्या ठिकाणचा गाव उचलला जातो.'' रोहिदास सातपुते, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.