आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:विसर्जन विहिरींवरील जाळ्यांची दुरुस्ती, स्वच्छता : सुरेश इथापे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून विसर्जन विहिरी व हौदांची दुरुस्ती, स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. येत्या दोन दिवसात विहिरींवरील जाळ्यांच्या दुरुस्तीचे व कृत्रिम विसर्जन स्थळांच्या नियोजनाचेही काम पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपाच्या मालकीच्या बाळाजी बुवा व यशोदानगर येथील विहिरींजवळ व्यवस्था करण्यात येणार आहे. या विहिरींवरील जाळ्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच बाळाजी बुवा येथील विहिरीची स्वच्छता झालेली असून, यशोदा नगर येथील विहिरीची स्वच्छता सुरू आहे. बुरुडगाव रोडवरील साईनगर येथे विसर्जनासाठी दरवर्षी व्यवस्था केली जाते. त्या हौदाचीही स्वच्छता केली आहे. दरम्यान, शहर अभियंता इथापे, निरीक्षक संपतराव शिंदे, ज्योती गडकरी, मनोज पारखे व पोलिस कर्मचाऱ्यांनी विहिरींची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...