आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त मिळाला!:नगर - औरंगाबाद रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू; एकेरी वाहतुकीने वाहनांचा वेग मंदावला

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- औरंगाबाद रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ते खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवार (11 नोव्हेंबरला) अहमदनगर- औरंगाबाद रस्त्यावरील महापालिकेजवळ असलेल्या मुकुंदनगर समोर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे काही अंतरावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मुकुंदनगर भागात वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता.

औरंगाबाद ते पुणे हा रस्ता अहमदनगर शहरातील डीएसपी चौक, कोठला चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, माळीवाडा बस स्थानक स्वस्तिक चौक बस स्थानक मार्गे पुण्याला जातो. औरंगाबाद -पुणे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे औरंगाबाद- पुणे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

औरंगाबाद -पुणे रस्त्यावरील अहमदनगर शहरातील मुकुंदनगरच्या गतिरोधकाच्या मागे व पुढे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. औरंगाबाद हुन पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे मुकुंद नगरच्या पाठीमागे काही अंतरावरून औरंगाबादहून पुण्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने करण्यात आली.

त्यामुळे महापालिका परिसर व डीएसपी चौकात काहीशी वाहतूक खोळंबलेली दिसून आली. वाहतूक वळविल्यानंतर औरंगाबादहुन पुण्याकडे व अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीला काहीसा विलंब लागत होता.

दरम्यान औरंगाबाद -पुणे रस्त्यावरील केडगाव ते सुपा दरम्यान देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पुण्याहून नगरकडे येणाऱ्या प्रवाशांना अत्यंत कमी वेगाने वाहने चालवावी लागत आहेत. तीच परिस्थिती नगर शहरातील अन्य रस्त्यांची देखील असून, कल्याण -विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. शहराबाहेरून जात असलेल्या बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अहमदनगर शहरा ऐवजी थेट शेंडी मार्गे केडगाव बायपासला लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...