आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:श्रीरामपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन; लोकसेवा विकास आघाडीचा इशारा

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरू करावीत, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला. याबाबत श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सिद्धार्थ मुरकुटे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, रोहन डावखर, भाऊसाहेब मुळे, रमेश सोनवणे, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, प्रमोद करंडे, अनिल कुलकर्णी, विराज आंबेकर, प्रवीण फरगडे, नवाब सय्यद, कैलास भागवत, बाळासाहेब गोराणे, अमित कोलते, भाऊसाहेब पवार, शरद वाघ, वैभव सुरडकर, शंकरराव डहाळे, लाला देवी, सुदेश झगडे आदींसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक प्रभागातील रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा येत असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित मंजूर करून दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...