आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:वीज बचतीबाबत मागवला अहवाल; पथदिव्यांच्या कामाबाबत आयुक्तांनी घेतला आढावा

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पथदिव्यांच्या वीज बिलात बचत होण्याच्या उद्देशातून शहरात खासगीकरणातून एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात कोणतीही बचत झालेली नाही. ठेकेदार कंपनीकडून बचतीसाठी नियमबाह्यपणे डीमिंग करण्यात येत आहे. दिव्यमराठीने याबाबत वृत्त प्रकाशित करताच मनपा आयुक्तांनी तातडीने बैठक घेत वीज बचत का होत नाही, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदार संस्था व विद्युत विभागाला दिले आहेत.

आयुक्त पंकज जावळे यांनी शुक्रवारी या संदर्भात ईस्मार्ट एनर्जी सोल्युशन कंपनीच्या प्रतिनिधी व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरात अद्याप सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत, पथदिव्यांच्या वीजबिलात अपेक्षित बचत झालेली नाही, कंपनीकडून व्हेज बिलात बचतीसाठी अतिशय त्यांचे उल्लंघन करत डीमिंग करण्यात येत आहे, देखभाल दुरुस्तीचे कामही ठेकेदार संस्थेकडून होत नाही, जुन्या काढलेल्या फिटिंगचे पैसे कंपनीने भरलेले नाहीत, नागरिकांना तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित झालेला नाही, ठेकेदार संस्थेच्या कामाची मुदत संपलेली असून त्यांनी बँक गॅरंटीची मुदत वाढवून दिलेली नाही, यासह विविध मुद्दे विद्युत विभागाकडून निदर्शनास आणण्यात आले.

एलईडी दिवे लावूनही वीज बिलात बचत का होत नाही, वीज विलास बचत होण्यासाठी काय करता येईल, याचा अहवाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर करावा. बँक गॅरंटीची मुदत आठवडाभरात वाढवून द्यावी. ज्या ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत, तेथे काम पूर्ण करावे. करारनाम्यातील अटी शर्तीनुसार काम पूर्ण करावे, असे आदेश आयुक्त जावळे यांनी ठेकेदार संस्थेला दिले. दरम्यान, ठेकेदार संस्थेवरील प्रस्तावित कारवाई संदर्भात मात्र, कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...