आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिकअपमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणार्या ३८ लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका एमआयडीसी पोलिसांनी केली. ९० हजार रुपयांची जनावरे व साडेतीन लाखांचा पिकअप (एमएच १७ बीडी ४१८२) असा चार लाख ४० हजारांचा मुद्दमाल ताब्यात घेतला आहे. शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ही कारवाई केली.
या प्रकरणी संगमनेर शहरातील तिघांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. अंमलदार सुरेश बबन सानप यांनी फिर्याद दिली आहे. मोसिन अन्वर कुरेशी (वय ३२), इजाज जलिल कुरेशी (वय ३३, दोघे रा. भारतनगर, संगमनेर) व आक्रम अहमद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील मोसिन अन्वर कुरेशी व इजाज जलिल कुरेशी यांना अटक केली आहे. सहायक निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदारांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्रीच काही गोमाता स्वयंमसेवकांनी शेंडी बायपास (ता. नगर) चौकात तीन टेम्पोतून कत्तलीसाठी जाणार्या ५९ म्हशी पकडल्या होत्या. यानंतर पुन्हा शनिवारी कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरे पकडल्याने नगर शहरातून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे जात असल्याचे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.