आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघा मालकांविरुद्ध गुन्हा दाखल:सावेडीतील दोन हॉटेलमधून चार बालकामगारांची सुटका

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात दोन ठिकाणी कारवाई करून चार बालकामगारांची सुटका केली. या प्रकरणी संबंधीत अस्थापना मालकाविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात कामगार अधिकारी यास्मीन अब्दुलगणी शेख यांनी फिर्याद दिली आहे.

शेख यांच्यासह निलेश बनसोडे, बाळु साळवे, पोलिस अंमलदार संदीप धामणे, एस.डी.शेलार यांनी आकाशवाणी जवळील मारूतीराव मिसळवाले येथे छापा टाकला असता, तेथे एक १४ वर्षीय बालकामगार आढळून आला. त्याची सुटका करत मालक अतुल दत्तात्रय खामकर (रा. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याच पथकाने दुसरी कारवाई गुलमोहोर रोडवरील हॉटेल क्लासिक येथे केली. तेथे त्यांना तीन बालकामगार मिळून आले. त्यांची सुटका करत हॉटेल मालक शेख विष्णु तुंगार (रा. सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

दरम्यान, कामगार विभाग व ताेफखाना पोलिसांनी दोन महिन्यापूर्वीही सावेडी उपनगर परिसरात बारा बालकामगारांची सुटका केली होती. मात्र अद्यापही अनेक छोटी उपहारगृहे हॉटेल व इतर आस्थापनांमध्ये लहान मुलांना कामावर ठेवले जात आहे. मागील महिन्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...