आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Reservation Of 9 Municipal Councils Of Ahmednagar Announced. Out Of 227 Seats, 114 Seats Are Reserved For Women; 18 Scheduled Castes, 4 Seats Reserved For Tribes

अहमदनगरच्या 9 नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर:227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव; 18 अनुसूचित जाती, 4 जागा जमातीसाठी राखीव

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नऊ नगरपरिषदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी झाली आहे. 227 जागांपैकी 114 जागा ( 50 टक्के आरक्षण) प्रमाणे महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यात 18 जागा अनुसूचित जाती व चार जागा जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.ओबीसी आरक्षणाशिवाय ही सोडत काढण्यात आली आहे. तत्पूर्वी या नऊ नगर परिषदांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती. दरम्यान नेवासे नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत देखील झाली. यात 17 जागांपैकी 9 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नगर परिषदा व नेवासे नगरपंचायत यांच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. 10 जूनला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नोटिशीद्वारे व संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी या नऊ नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात आले. संबंधित नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी सोमवारी ही आरक्षण सोडत काढली. नऊ सर्वसाधारण नगर परिषदांमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 92, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 18 व अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाच्या 4 अशा एकूण 114 जागांच्या आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान नेवासे नगरपंचायतीची मुदत 18 जूनला संपणार असून या नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत देखील झाली 17 जागांपैकी 9 जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.

15 ते 21 जून या कालावधीत हरकती

या आरक्षणावर हरकती व सुचना मागवण्यासाठी 15 जून लाआरक्षणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 15 ते 21 जून या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 24 जून पर्यंत आरक्षण व सोडतीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्त तथा नगर परिषद विभागाकडे पाठवण्यात येणार असून, 29 जूनपर्यंत सदस्यांच्या आरक्षणास मान्यता देण्यात येणार आहे. सदस्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय संकेत स्थळावर प्रसिद्ध करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...