आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण‎:राहुरी नगर परिषदेसाठी सर्व साधारण‎ महिलांसाठी नऊ जागांचे आरक्षण‎ ; नागरिकांची‎ मोठी गर्दी जमली होती

राहुरी‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी नगर परिषदेतील महिलांच्या‎ १२ जागांचे आरक्षण सोमवारी लहान ‎ ‎ मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून जाहीर ‎ ‎ करण्यात आले. यामध्ये सर्व‎ साधारण महिलांसाठी ९ जागा, ‎ ‎ अनुसूचित जाती महिलांसाठी २, ‎ ‎ अनुसूचित जमाती महिलासांठी १‎ जागेचे आरक्षण निघाले.‎ राहुरी नगर परिषदेच्या २४ पैकी‎ १२ राखीव जागांच्या आरक्षणाची‎ सोडत सोमवारी सकाळी‎ साडेअकरा वाजता नगर परिषद‎ सभागृहात काढण्यात आली.‎ सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग १‎ अ, प्रभाग २ ब, प्रभाग ३ अ, प्रभाग‎ ४‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ब, प्रभाग ५ अ, प्रभाग ६ अ,‎ प्रभाग ८ ब, प्रभाग ९ अ, प्रभाग १०‎ अ, अनुसूचित जाती महिला प्रभाग‎ ७ अ, प्रभाग १२ अ, अनुसूचित‎ जमाती महिलासाठी प्रभाग ११ अ‎ जागा महिलासाठी राखीव करण्यात‎ आल्या आहेत. या सोडतीबाबत २४‎ जूनपर्यंत हरकती घेण्याची मुदत‎ असून २९ जूनला हरकती निकाली‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ काढून १ जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध‎ केली जाणार आहे. राहुरी नगर‎ परिषदेच्या १२ जागांच्या आरक्षणाची‎ सोडत असल्याने नगर परिषद‎ सभागृहात उत्साही नागरिकांची‎ मोठी गर्दी जमली होती. पुर्नवसन‎ विभागाच्या उपजिल्हाधिकारी‎ पल्लवी निर्मळ यांच्या उपस्थितीत‎ आरक्षण सोडत जाहीर केली.‎राहुरी नगर परिषदेच्या १२ प्रभागाचे महिला आरक्षण जाहीर.‎

बातम्या आणखी आहेत...