आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न:कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न महिन्याभरात सोडवू : मंत्री गायकवाड

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण येत्या महिनाभरात ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना देण्यात येईल, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न महिन्याभरात सोडवू, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. मुंबई येथे शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबत बैठक पार पडली‌. या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार बाळाराम पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार किरण सरनाईक, आमदार आजगावकर, आमदार कपिल पाटील, आमदार नागो गाणार, राज्याचे शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक महेश पालकर, राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.नवनाथ टकले व प्रा. सतीश शिर्के यांनी दिली.

या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय झाले. वाढीव पदांना मान्यता देण्याबाबत येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळ बैठकीसमोर सर्व माहितीसह दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल. आयटी विषय शिक्षकांच्या मान्यतेसंदर्भात सर्व माहिती ३० एप्रिल २०२२ पर्यंत मागवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मंत्रीमंडळबैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. घड्याळ तासिकावरील शिक्षकांचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्याचे संचालक पालकर साहेब यांनी पुढील आठवड्यात प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मा शिक्षण मंत्र्यांनी दिले.

या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ.संजय शिंदे सचिव प्रा. संतोष फाजगे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर हे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल शिक्षण मंत्री गायकवाड यांचे महासंघातर्फे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...