आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल विभाग लोकाभिमुख काम करत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामामुळे शासनाची प्रतिमा उजळ होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मंगळवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विठ्ठल बुलबुले, निवृत्त कर्नल आर. व्ही. धुमाळ आदी उपस्थित होते.
संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत रामदास मंगरुळे यांचा उपजिल्हाधिकारी संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, संगमनेर नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक पल्लवी खेडकर, अव्वल कारकून रामकिशन नलवडे, किशोरी त्र्यंबके, मंडळाधिकारी सचिन पोटे, महसूल सहायक वैशाली धायगुडे, कैलास खाडे, तलाठी ऋषिकेश खताळ,श्रीराम कुलकर्णी,, सतीष गायके (कोपरगाव तहसील), वाहनचालक म्हातारदेव मोरे, शिपाई दीपक दिनकर (पाथर्डी तहसील), कोतवाल महेश देशमुख, विकास वर्पे, तुळशीराम शिंदे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, बाळासाहेब घुले, अंबादास देवकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.