आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:दैठणे गुंजाळ येथे कृषी रसायन साक्षरता कार्यशाळेला प्रतिसाद

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस शेतीवरील खर्च आणि त्याबदल्यात येणारे उत्पन्न याचा मेळ तुटत चालला आहे. रासायनिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला भडीमार हे शेतकऱ्यांच्या खर्चाचे प्रमुख कारण ठरत आहे. तसेच रासायनिक उत्पादने वापरल्याने जमिनीची सुपीकता तर घटलीच परंतु विषमुक्त अन्नधान्यही दुर्मिळ झाले. याच पार्श्वभूमीवर बायोमी इनोव्हेटिव्ह लर्निंग फाउंडेशनची शेतकऱ्यांसाठी कृषी रसायन साक्षरता कार्यशाळा दैठणे गुंजाळ येथे पार पडली.

दरवर्षी त्याच पिकांना त्याच समस्या येतात. त्याच औषधांचा, रसायनांचा भडीमार होतो आणि दरवेळी शेतकरी तोट्यात जातो. मुळातच पिक उभारणीवर खर्च कमी व्हावा, म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आले तरी शेतकरी नफ्यात राहिल, या हेतूने या कार्यशाळेत मुद्दे मांडून रसायन निर्मिती प्रात्यक्षिक केले गेले. यावेळी अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.या कार्यशाळेत शेतकऱ्यांना कृषी रसायन साक्षरता, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पीक आणि मातीनुसार खत व्यवस्थापन, प्रमाणित सेंद्रिय शेती, बायोफर्टिलायझर्सची ओळख, मार्केट लिंकेज डेव्हलपमेंट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी किमतीच्या निविष्ठांची थेट शेतीत निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांना अॅग्री इनपुट ट्रेनिंग किटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले, ज्या माध्यमातून आता शेतकरी स्वतः शेताच्या बांधावर बसून कृषी निविष्ठांची निर्मिती करू शकतील. तसेच माती परीक्षण म्हणजेच मातीचा जिवंतपणा तपासण्यासाठी बायोमी टेक्नोलॉजीज निर्मित कीट देण्यात आले. रसायने, यंत्र, प्रयोग, त्याचा शेतीसाठी उपयोग अशी माहिती देण्यात आली. यासाठी बायोमीचे प्रमुख शास्रज्ञ व कृषी-जीवरसायनतज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्यासह टीमने मेहनत घेतली. तसेच रितेश पोपळघट आणि सर्वेश घंगाळे यांनीही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...