आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:धनगरवाडी येथे सर्वरोग निदान शिबिराला प्रतिसाद

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे आज अनेकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, गरजू व गरजवंत नागरिकांना या समाजामध्ये सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे मदतकार्य सुरू आहे. उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीने धनगरवाडी ग्रामस्थांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून गरजवंत नागरिकांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक बापूराव तागड यांनी केले.

उत्कर्ष फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भिसे व धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे यांच्या वतीने धनगरवाडी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले. डॉ. राहुल पंडित यांच्या हस्ते द्रीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक तागड बोलत होते.