आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:जिल्हास्तरीय योगासन पंच प्रशिक्षणाला प्रतिसाद; 950 प्रशिक्षणार्थींचा घेतला सहभाग

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगासनांचा खेळात समावेश झाल्यापासून देशभरात या खेळाचे महत्त्व वाढले आहे. आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस्फे डरेशनपासून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनपर्यंतच्या विविध संस्थांकडून योगासनांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने ३ दिवसीय ऑनलाईन पंच प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला. या शिबिरात राज्यभरातील ९५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, अशी माहिती असोसिएशनचे राज्यसचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

रविवार ते मंगळवार या कालावधीत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून ९५३ प्रशिक्षकांनी सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयदीप आर्य यांनी केले. त्यांनी संघटनेच्या कार्यात महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल कौतुक केले. राज्य संघटनेचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी राज्य स्पर्धा प्रमुख सतीश मोहगावकर यांनी शिबिराची रूपरेषा आणि आवश्यकता याबद्दल माहिती दिली.

सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्याने या शिबिराचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून योगासन स्पर्धांची पद्धत, त्याचा अभ्यासक्रम, पंचांचे कार्य व जबाबदारी, सूक्ष्म गुणांकन, सॉफ्टवेअरचा वापर आदी विषयांवर सतीश मोहगावकर, राजेश पवार, महेश कुंभार, स्नेहल पेंडसे, भूषण टाके, सुहास पवळे, मंगेश खोपकर, निलेश पठाडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजय मालपाणी आणि प्रशिक्षकांनी प्रशिक्षणार्थीच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणाचा तांत्रिक भाग निलेश पठाडे यांनी सांभाळला. बुधवारी ऑनलाईन पद्धतीने लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. शिबिराचा समारोप राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उदित सेठ यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी योगासन फेडरेशनची स्थापना, राष्ट्रीय योगासन स्पर्धा, आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा आणि भविष्यात ऑलिम्पिकमध्ये योगासन खेळाचा समावेश होणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू पाडळकर प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. डॉ. संजय मालपाणी यांनी प्रास्तविक केले. राजेश पवार व रुचिता ठाकूर यांनी सूत्रसंचालन तर स्नेहल पेंडसे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...