आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक:‘गजर गुढीचा, सन्मान नेवासकरांचा’ कार्यक्रमास प्रतिसाद, काशीविश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने नेवासे शहरातील रसिक प्रेक्षकांची जिंकली मने

नेवासे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशीविश्वेश्वर प्रतिष्ठानने मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला गजर गुढीचा सन्मान नेवासकरांचा या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन रामकृष्ण परमहंस आश्रमाचे स्वामी ज्ञानेश्वर महाराज व नेवासे शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष योगिता पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पाचेगाव येथील अशोकराव नांदे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यान दिले. रामकृष्ण परमहंस आश्रमाचे स्वामी ज्ञानेश्वर महाराज, उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील गळनिंब येथील गीता काकासाहेब मुळे, निराधार व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या आधार सेवा संकल्प प्रतिष्ठान वडाळा बहिरोबा संस्थेचे अध्यक्ष जयंत मोटे, कोरोना काळात चांगले काम केलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गिते, जुन्या काळात विविध कार्यक्रमात बँड वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे नेवासे बुद्रूक येथील जयवंत नाथा चांदणे, पसायदान संस्थेची स्थापना करून ग्रंथालय अभ्यासिका वृक्ष लागवड व संवर्धन करणारे पाचेगाव येथील विजय बाबू तुवर, कोरोना काळात शहराकडून गावी पायी चाललेल्या मजुरांना अन्न, वस्त्र देण्यासाठी तीन लाख रुपये व किराणा साहित्य जमा करून रोज एक हजार जणांना दोन महिने अन्नछत्र चालविणाऱ्या नेवासे येथील विवेक भावना ग्रूपचे सदस्य या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी शहरातील स्थानिक गायक अजय कुलकर्णी, सुधीर चव्हाण, अभय मोहिते, माधुरी कुलकर्णी, राजू शेख, शंकर गव्हाणे, राजेश कडू, आदेश टेकाळे, डॉ. शंकर शिंदे, प्रा. सुनील गर्जे आदींनी मराठी- हिंदी गिते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे नितीन कुलकर्णी, विजय कोकणे, मनोज पारखे, संतोष भांबर यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन औरंगाबाद येथील मेलडी क्विन ऑर्केस्ट्राच्या कल्पना ढोकणे यांनी केले. आभार सतीश पिंपळे यानी मानले.

बातम्या आणखी आहेत...