आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंचेती हॉस्पिटल,भारतीय जैन संघटना (बीजेएस) व चांदमल मुनोत ट्रस्ट,यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारी या कालावधीत पुण्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी ५०० हून अधिक रूग्णांनी नोंदणी केली. जवळपास २०० वंचित रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन युएसएमधील प्लास्टिक सर्जन डॉ.लॅरी वाईनस्टाईन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती,युएसए येथील प्लास्टिक सर्जन डॉ.बॅरी सिट्रॉन, चेस्टर सर्जरी सेंटर,यूएसए च्या संचालिका डॉ.लिंडा पॅटरसन,प्लास्टिक व हँड सर्जन डॉ.लॉरेन्स ब्रेनर,प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजक शशिकांत मुनोत,संचेती हॉस्पिटल चे महाव्यवस्थापक राहुल चौबे आदी उपस्थित होते.या शिबिरात दुभंगलेले ओठ,टाळू (क्लेफ्ट लिप व पॅलेट), नाक, भुवया, कानासंदर्भात विकृती यासारख्या समस्यांवरील उपचारांचा समावेश अाहे. प्लास्टिक सर्जरी तंत्राचा वापर करून उपचार केले जातील.
प्लास्टिक सर्जन डॉ. वाईनस्टाईन म्हणाले, डॉ.दीक्षित यांनी आयुष्यभर दिव्यांगांची सेवा केली,त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी झाले. डॉ.दीक्षित जरी आपल्या सोबत नसले तरी त्यांनी सुरू केलेली ही मानवतेची सेवा थांबणार नाही. संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती म्हणाले, मोफत प्लास्टिक शिबिरांमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे. डॉ. के.एच.संचेती आणि शांतीलाल मुथा हे दोघेही आमच्यासाठी प्रेरणास्थान व मार्गदर्शकशक्ती आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.