आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी छापा टाकलेल्या सर्व गावठी दारू हातभट्ट्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकांमुळे अवैधपणे विदेशी दारू विक्रीचा वेगही दहा पट झाल्याचे दिसत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात सर्रासपणे बेकायदा बनावट विदेशी मद्य विक्री सुरू आहे. त्यामुळे नेहमी कारवाईच्या प्रसिद्धी झोतात असणारे संदीप मिटके हे केवळ गावठी दारूचे कर्दनकाळ आहेत काय, असा प्रश्न लोक विचारत आहे. राहुरी तालुक्यात गावठी नव्हे तर बनावट इंग्लिश दारुतूनच पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. या बनावट दारू विक्रीच्या धंद्यातून तालुक्यात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यात पोलिस उपाधीक्षक मिटके यांनी श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील अनेक गावठी हातभट्ट्या वर छापेमारी करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला या कारवायांचे वृत्त वर्तमानपत्रात छायाचित्रांसह प्रसिद्ध झाले. या बातम्या शिळ्या होत नाही तोवरच संबंधित ठिकाणी ते अवैध व्यवसाय दुप्पट गतीने सुरू झाले आहेत. हातभट्टीवर कारवाई करणे जितके गरजेचे आहे. तितकेच बेकायदा व बनावट विदेशी दारू विक्रीवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. हा बनावट दारू विक्री व्यवसाय मात्र सर्रासपणे सुरू आहे याकडे मिटके जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात काय असा प्रश्न चर्चिला जात आहे.
सोनगाव सात्रळ ते कात्रड गुंजाळे आणि मांजरी ते म्हैसगाव, श्रीरामपूर ते धामोरी फाटा या महामार्गावर हॉटेल तिथे दारू विक्री केली जाते,टाकळीमिया गावात तर टपरीवर देखील विदेशी सहज उपलब्ध होतेय. मांजरी म्हैसगाव, सोनगाव सात्रळ, गुहा, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, ब्राम्हणी, उंबरे, वांबोरी आदी मोठ्या गावात हीच स्थिती आहे. हे मिटके यांच्या लक्षात कसे येत नाही. श्रीरामपूरवरून निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या प्रत्येक ढाब्यावर विक्री केली जाणारी विदेशी दारू मिटके यांच्या नजरेतून कशी सुटते. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चिंचोली फाटा येथे पर जिल्ह्यातून खाली होणाऱ्या दारूच्या खोक्यांमध्ये ओरिजिनल की बनावट मद्यमध्ये भरलेले आहे याचे उत्तर पोलिस खात्याला अजूनपर्यंत सापडलेले नाही, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. राहुरी तालुक्यात अवैध तसेच बनावट दारू विक्री, मटका आणि जुगार अड्डे, वाळू तस्करी, गावठी कट्टे विक्री यातील कोणताच प्रकार थांबलेला नाही. मात्र तालुक्यात सर्व काही अलबेल असल्याचे भासवण्यात टीम मिटके यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.