आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानांचे लँडिंग:शिर्डीत विमानसेवेला पुन्हा प्रारंभ; सहा महिन्यांनी लँड झाले विमान

शिर्डी / नवनाथ दिघे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साईंचे मंदिर ७ ऑक्टोबरला उघडल्यानंतर १० तारखेपासून साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवरील विमानांचे लँडिंग व टेकऑफ सुरू करण्यात आले आहे. १८ एप्रिल २०२१ नंतर सहा महिन्यांनी रविवारी सायंकाळी स्पाइसजेटचे चेन्नईहून आलेले बोइंग येथे ४ वाजता लँड झाले. १९० आसनक्षमतेच्या या विमानात चेन्नईहून १७१ भक्त शिर्डीत दाखल झाले, तर शिर्डीहून सायंकाळी ४.३० वाजता ४० साईभक्त या विमानातून रवाना झाले. दरम्यान, स्पाइसजेट मंगळवारपासून दिल्ली ते शिर्डी विमानसेवा सुरू करत आहे. इंडिगो कंपनीचीही येत्या शुक्रवारपासून दिल्ली-शिर्डी सेवा तर शनिवारपासून हैदराबाद-शिर्डी सेवा सुरू होत आहे.

- स्पाइसजेट : चेन्नई-शिर्डी लँडिंग सायंकाळी ४ वाजता दररोज - शिर्डी-चेन्नई बोइंग सायंकाळी ४.१५ वाजता दररोज - दिल्ली-शिर्डी बोइंग लँडिंग दुपारी ११.५० वाजता, शिर्डी-दिल्ली टेकऑफ दुपारी ३.२० वाजता. (१२ ऑक्टोबरपासून रोज) - इंडिगो : दिल्ली-शिर्डी बोइंग लँडिंग दु्पारी १.१० वाजता . सोम, बुध, रवी. (१५ ऑक्टोबरपासून), शिर्डी-दिल्ली बोइंग टेकऑफ दुपारी १.४० वाजता. - हैदराबाद-शिर्डी लँडिंग दुपारी १.०५ वाजता. मंगळ, बुध, गुरू, शनि., शिर्डी-हैदराबाद टेकऑफ दु. ०१.३० वा. (१६ ऑक्टोबरपासून) - महिनाभरात शिर्डीसाठी मुंबई, बंगळुरू ,भोपाळ,अहमदाबादसह देशातील प्रमुख शहरांतून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न विमान कंपन्यांनी सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...