आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त उपायुक्त सीताराम भालेकर म्‍हणाले:श्रीसंत भगवान बाबा पतसंस्थेची नेत्रदीपक प्रगती

राहुरी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी तालुक्यातील श्रीसंत भगवानबाबा पतसंस्थेने संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपराव आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करून पतसंस्था चळवळीत आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त उपआयुक्त सीताराम भालेकर यांनी केले. राहुरीतील श्रीसंत भगवान बाबा पतसंस्थेला आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त उपआयुक्त सीताराम भालेकर यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. भालेकर म्हणाले, सहकार चळवळीत काम करताना सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. कर्ज वाटप व्यवहारात पारदर्शीपणा असल्यास पतसंस्थेला प्रगती करण्यास वेळ लागत नसल्याचे भालेकर म्हणाले. संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपराव आघाव यांच्या हस्ते भालेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. प्रदीप मुळे, शिवाजीराव चव्हाण, सौरभ भालेकर, उद्योजक प्रशांत मुसमाडे, ऑडिटर अनिल येवले, अॅड. विवेक तांबे, राजेंद्र उगलमुगले, चोथे, मॅनेजर अजय आघाव तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

पतसंस्थेला सीताराम भालेकर यांनी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...