आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिका प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करीत २३ सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारपासून (२ फेब्रुवारी) पालिका कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. आंदोलक निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राहुरी नगरपरिषद कामगार क्रेडीट को-ऑप. सोसायटीकडील कर्जवसुलीसाठी पालिकेतील २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीविषयक रजा रोखीकरण रकमेबाबत (उपदाने) संबंधित कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्वसंमती घेतलेली नाही. तसेच, याबाबत संबंधित सोसायटीने कोणतीही लेखी सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या नात्याने कर्मचाऱ्यांना दिलेली नाही.
असे असताना, २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीविषयक रजा रोखीकरण रक्कम (उपदाने) बेकायदेशीरपणे कपात करण्यात आली. सद्य:स्थितीत अवसायनात असलेल्या नगरपरिषद सोसायटीकडे वर्ग करण्यात आली आहे. राहुरी नगरपरिषद प्रशासनाचे हे धोरण पुर्णत: बेकायदेशीर व संबंधित २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालिकेतील २३ सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी २ फेब्रुवारीपासून नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणात सेवानिवृत्त कर्मचारी वसंत लाहुंडे, एकनाथ जगधने, प्रल्हाद भारसकर, विजय गायकवाड, लता मिसाळ, पोपट गायकवाड, नवनाथ घोडेकर, उत्तम दाभाडे, बापूसाहेब धनवटे, बाळासाहेब दाभाडे आदींसह २३ निवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत.
लेखी खुलासा करण्यास विलंबसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी लेखी तक्रार दाखल केलेली आहे. याबाबत १५ डिसेंबर २०२२ पर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही लेखी खुलासा सादर केलेला नाही. सेवानिवृत्ती विषयक रजा रोखीकरण रक्कम (उपदाने) संबंधित राहुरी नगर परिषद प्रशासनाकडुन होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सेवानिवृत्त २३ कर्मचाऱ्यांचे नगरपरिषद कार्यालया समोर उपोषण सुरू केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.