आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आपला विद्यार्थी राज्यमंत्री असल्याचा सार्थ अभिमान, राहुरीतील प्रगती शाळेतील निवृत्त शिक्षकांचे प्रतिपादन

राहुरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या शाळेत शिक्षण घेतलला विद्यार्थी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया निवृत्त शिक्षकांनी व्यक्त करून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वाटचालीचे कौतूक केले. तीन दशकांपूर्वी राहुरीच्या प्रगती शाळेत दहावीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक एकत्र येण्याचा योग सोमवारी जुळून आला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळेच आम्ही आज वेगळ्या क्षेत्रात कामगिरी केल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तीन दशकाच्या कालावधीनंतरही आठवणीने बोलावून आम्हाला सन्मानित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान असल्याच्या भावना सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यक्त केल्या. यावेळी शिक्षक एन. एन. उगले, जी. डी. कराळे, एस. एस. कोहकडे, ए. जी. तनपुरे, एस. एस. गुलदगड, एस. डी. शेडगे, एन. ई. पवार, एस. एल. वाखारे, एस. बी. गुणे, बी. व्ही. वीरकर, एस. डी. भालसिंग, एस. यू. आमले, एस. आर. कदम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुरी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, गोवर्धन तनपुरे, दत्तात्रय कदम, सलीम बागवान, संजय बनसोडे, संजय शिरसाठ, महादेव साखरे, अनिल कोकाटे, जलील पठाण आदींनी परिश्रम घेतले.