आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगट दिन साजरा:गुलमोहोर रोड व सिव्हील हडको येथील स्वामी समर्थ मंदिरांत प्रगट दिन साजरा, भाविकांना महाप्रसादाचे वाटप

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील श्रीस्वामी समर्थ मंदिरात आणि सिव्हील हडको परिसरातील श्रीस्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात भक्तीमय वातावरणात भाविकांच्या प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला. सिव्हील हडको परिसरातील श्रीस्वामी समर्थ मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे धार्मिक उत्सव भक्ताविना साजरे झाले. पण यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा होऊन रविवारी श्रीस्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुलमोहोर रोडवरील श्रीस्वामी समर्थ मंदिरात पहाटे ‘श्रीं’ना मंगलस्नान घालण्यात आले. स्वामींना रुद्राभिषेक डॉ. श्री. व सौ. आनंद नांदेडकर, नाशिक येथील श्री व सौ. शरद सरोदे, श्री व सौ.राजेंद्र चौधरी, डॉ.श्री व सौ. प्रद्युम्न पुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त तीन दिवसांचे गुरुलिलामृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. यामध्ये २१ अध्यायांचे वाचन भाविकांनी केले. दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी नगरसेवक अमोल गाडे, सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंदिरासमोर दगडी कमान व प्रवेशद्वाराला लोखंडी गेटचे काम करून दिल्याबद्दल बाबासाहेब वारे यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कायम स्वरुपी मंदिराच्या विकास कामांसाठी सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महाआरती झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

यासाठी सुनील मानकर, जितेंद्र चत्तर, संदीप पाटील, पंकज गुजराथी, डॉ. योगेश वाघमारे, गिरीष धर्माधिकारी, विनायक पेरे, बाबासाहेब मरकड, सुधाकर वाकळे, अच्युत पटवर्धन, रमेश म्याना, विजू पानमळकर आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...